दुपारच्या बातम्या । उद्यापासून सोलापुरातील निर्बंध शिथिल होणार? | Restrictions in relaxed Solapur

दुपारच्या बातम्या । उद्यापासून सोलापुरातील निर्बंध शिथिल होणार? | Restrictions in relaxed Solapur

#YesNewsMarathi #HEADLINES
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बैठक घेऊन पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांचा आढावा घेतला. पुण्यातील रुग्ण संख्या कमी झाल्यामुळे उद्या म्हणजे सोमवार पासून पुण्यात सायंकाळी सात वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे त्याच धर्तीवर आता पुणे कोल्हापूर सांगली सातारा आणि सोलापुरातील रुग्ण संख्या देखील कमी झाली आहे या सर्व पार्श्वभूमीवर उद्यापासून ग्रामीण भागात तसेच शहरात नवीन निर्बंध लागू करण्यातबाबत आज त्या त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त आदेश काढणार आहेत त्यानुसार सोलापुरातील दुकाने देखील उद्या पासून सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा आदेश महापालिका आयुक्त पी शिवशंकर काढण्याची शक्यता आहे आज दुपारपर्यंत हा आदेश निघणार आहे त्यामुळे व्यापारी वर्गामध्ये आणि हॉटेल व्यावसायिकांमध्ये या आदेशाची प्रतीक्षा आहे

Good news उजनी भरू लागली @25%
उजनी धरण रविवारी सकाळी सहाच्या आकडेवारीनुसार प्लस पंचवीस टक्के भरले आहेत दौंड मधून 48 हजार क्यूसेक  वेगाने पाणी उजनी धरणात मिसळत आहे गेल्या बारा तासात उजनीतील पाणी साठा तब्बल सहा टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे  123 टीएमसी क्षमता असलेल्या धरणात 77 TMC पाणीसाठा झाला आहे.

जिल्हा परिषदेची उद्या तर सोलापूर महापालिकेची परवा सभा
सोलापूर जिल्हा परिषदेची ऑफलाइन सर्वसाधारण सभा सोमवारी फडकुले सभागृहात होणार आहे. या सभेला सदस्यांची rt-pcr चाचणी करूनच सभागृह सोडले जाणार आहे तर सोलापूर महापालिकेचे सन 2021 22 या वर्षाचे बजेट सादर करण्यासाठी मंगळवारी अर्थसंकल्पीय सभा मनपा सभागृहात ऑफलाइन होणार आहे सत्ताधारी भाजपने बजेट सादर करण्यासाठी गेल्या तीन दिवसापासून प्रशासनाबरोबरच बैठका सुरू केल्या आहेत

महाबळेश्वरचा पाऊस चेरापूंजीच्या देखील पुढे
देशात सर्वाधिक पाऊस चेरापूंजी ला पडतो मात्र या चेरापुंजी चे रेकॉर्ड महाराष्ट्रातील महाबळेश्वर ने मोडले आहे. एक जून पासून चेरापूंजी 3500 मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे तर महाबळेश्‍वरमध्ये 3700 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. रत्नागिरी पेक्षाही महाबळेश्वर मध्ये जास्त पाऊस झाला आहे

कोल्हापूर आणि सांगलीत महापूरशी झुंज
टप्प्याटप्प्याने सांगली आणि कोल्हापुरातील पाणी पातळी कमी होऊ लागली आहे त्यामुळे अजूनही हे दोन्ही जिल्हे महापूराची झुंज देत आहेत सांगलीत सुमारे एक लाख हून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे तर कोल्हापुरात देखील एनडीआरएफच्या जवानांनी मोठ्या प्रमाणावर मदत कार्य सुरू ठेवले आहे कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू ठेवल्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीतील पाणी पातळी कमी होऊ लागली आहे

★Follow us, Share, Support★
Website:- http://yesnewsmarathi.com
Facebook:- https://www.facebook.com/yesnewsmarathi
Twitter:- https://twitter.com/yesnewsmarathi
shivaji survase 9881748329

★Contact us★
mobile- 9881748329
Email:- yesnewsmarathi@gmail.com

येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.

MarathinewsSolapur

Post a Comment

0 Comments